जीवनकलेची साधना
।। * जीवनकलेची साधना * ।।
जगद्गुरू श्रीहंबीरबाबा यांची वाङ्गमयमूर्ती म्हणजे 'जीवनकलेची साधना' हा स्वधर्मग्रंथ होय. अगदी साध्या सोप्या भाषेत लिहिलेला हा एक छोटासा ग्रंथ आहे.
आचार्यभक्त वेदांतकेसरी, अद्वैतवेदान्तालंकार उपनिषत्तीर्थ पंडित द. वा. जोग प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे श्रीहंबीरबाबांनी या ग्रंथात देव, धर्म, भक्ती व आश्रमधर्म या महत्त्वाच्या विषयांबाबत साधार व नेमकेपणे मार्गदर्शन केले आहे.
आतापर्यंत या ग्रंथाच्या १० आवृत्ती व त्याचे हिंदी व इंग्रजी अनुवादही प्रसिद्ध झाले आहेत. या स्वधर्मग्रंथात पुढील बाबींची निःसंदिग्ध माहिती मिळते :
१) 'खरा देव' भेटावा म्हणून करावयाच्या 'खऱ्या भक्ती'चे स्वरूप!
२) 'देव पहावयासी गेलो । तेथे देवचि होऊनि ठेलो ।।' या श्रीतुकारामकृत अभंगाचा अनुभव!
३) ज्या 'नामापरते तत्त्व नाही' ते सोपे नाम जपण्याची रीत!
४) 'देव आपल्या देहात राहतो', हा सिद्धान्त!
५) कायारूपी पंढरीत असलेल्या विठ्ठलाचे स्वरूप!
६) श्रीसदगुरुंचे आणि ते करतात त्या सत्कार्याचे स्वरूप!
७) देवाला आवडणाऱ्या एकचित्ताने करावयाच्या थोर भक्तीची रीत!
८) कर्मयोगाचे म्हणजे अखंड नामानुसंधानस्वरूप श्रेष्ठ तपाचे स्वरूप!
९) ज्ञानेश्वरीचे सार व ज्ञानेश्वरी आचरणात आणण्याची रीत!
१०) ज्ञानेश्वरीतील पंथराजाचे साद्यन्त पण संक्षिप्त वर्णन!
११) विश्वातील सर्व मानवांच्या त्रिविध स्वधर्माचे स्पष्टीकरण!
१२) सगुण आणि निर्गुण परमेश्वर याबाबत निरूपण!
१३) संतकृत एकादशीचे व तीर्थाचे स्वरूप!
१४) सकाळी व संध्याकाळी करावयाच्या आध्यात्मिक संध्येचे स्वरूप!
१५) दिनभर प्रपंच आणि क्षणभर लाख मोलाचा परमार्थ करण्याची रीत!
१६) श्रीज्ञानदेवांनी 'हरिपाठात' गौरविलेली 'जीवनकलेची साधना'!