Powered by Flash Template Designed by Website Templates
वृत्तांकन
नाव E-मेल
हायलाइट्स

२१/०१/२०२०
प्रवचनकार कीर्तनकारांचे राज्यस्तरीय सातवे खुले संमेलन
Read more...

संपर्कासाठी माहिती
an image
आश्रम.
पाटेठाण,दौंड,पुणे,महाराष्ट्र
E-मेल: vishwavyapimanavdharma
@gmail.com


भ्रमणध्वनी:
(+91) 123 456 7890

कार्यक्रम

।। * * नियोजित कार्यक्रम * * ।।

१) प्रवचनकार कीर्तनकारांचे राज्यस्तरीय सातवे खुले संमेलन
मंगळवार दि.२१/०१/२०२०
स्थळ :- मंगल चारोधाम मंडप ट्रस्ट राष्टसंत
तनपुरे महाराज मठ स्टेशन रोड, पंढरपुर!.

।। * * नियोजित कार्यक्रम * * ।।

विश्वव्यापी मानवधर्म आश्रमाचे अध्यक्ष सदगुरू समर्थ श्री. सुमंतबापुजी हंबीर यांचे अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनानुसार पुढील कार्यक्रमांचे आयोजन केले जाते -

१) गुरुपूजन दरवर्षी पुणे येथे आषाढ (व्यास) पौर्णिमेला महाराष्ट्र राज्यातील हजारो साधकांच्या उपस्थितीत गुरुपूजा केली जाते व सद्गुरुंच्या प्रवचनानंतर नवीन भाविकांना अनुग्रह दिला जातो.
२) अखंड ध्यानरूपी मौन नामसप्ताह प्रत्येक वर्षी आश्विन शुद्ध ८ ते कोजागरी पौर्णिमा या कालावधीत जगद्गुरू श्रीहंबीरबाबा यांचे पुण्यस्मरणाप्रीत्यर्थ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. सप्ताहकाळात समाधिस्थली असणाऱ्या ध्यानमंदिरात साधक सोsहंभावयुक्त ध्यान करतात, सकाळी योगासने व सबीज प्राणायाम यांचे प्रशिक्षण दिले जाते, निमंत्रित मान्यवरांची प्रवचने होतात व रोज संध्याकाळी सदगुरुंचे समालोचनात्मक प्रवचन होते.
३) पौर्णिमा प्रवचन प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला शेकडो साधक ध्यानमंदिरात ध्यानसाधना करतात व संध्याकाळी श्रीसदगुरुंचे मार्गदर्शनात्मक प्रवचन होते.
४) १५ तारीख प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला यजमान शिष्याचे / शिष्यान्चे गावी श्रीसदगुरुंचे प्रवचन व मार्गदर्शन या श्रीहंबीरबाबा यांनी सुरू केलेल्या कार्यक्रमात होत असते.
५) आध्यात्मिक शिबिरे दरवर्षी ऑगस्ट महिन्यात राहुरी (जि. अहमदनगर), डिसेंबर-जानेवारीमध्ये तमनर आखाडा (जि. अहमदनगर), मे मध्ये येरणे-महाबळेश्वर आणि मार्चमध्ये आडगाव दराडे (जि. परभणी) या गावी त्रिदिवसीय आध्यात्मिक शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरात पहाटे (ब्राह्मी मुहूर्तावर) ३ ते ६ श्रीसद्गुरुंसमवेत ध्यान, सकाळी योगासने व प्राणायाम, दुपारी व संध्याकाळी एकेक तास ध्यान, मधल्या वेळात मान्यवरांची प्रवचने आणि संध्याकाळी श्रीसदगुरुंचे समालोचनात्मक प्रवचन, असे या शिबिरांचे स्वरूप असते.
६) सदगुरुंची प्रवचने पूर्वनियोजित गावी श्रीसद्गुरुंची मासिक, द्वैमासिक व वार्षिक अशी एकूण २०-२५ प्रवचने होत असतात.
७) प्रवचनकार व कीर्तनकार यांचे संमेलन वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक जीवनाला आपल्या भारतीय संस्कृतीतील धार्मिक-आध्यात्मिक मूल्यांची बैठक देणे; योगासने, प्राणायाम व संतकृत नामयुक्त ध्यानधारणा शिकविणे या पारमार्थिक कार्याला गती मिळावी, त्याबाबत विचारविनिमय व्हावा व 'एकमेकां साह्य करू' या न्यायाने महाराष्ट्रातील प्रवचनकार व कीर्तनकार यांनी एकत्र येऊन कार्य करावे, या हेतूने विश्वव्यापी मानवधर्म आश्रमाने आतापर्यंत अनुक्रमे पुणे, शिर्डी, महाबळेश्वर, आळन्दी, देहू, शनिशिंगणापुर येथे एकूण ६ संमेलने आयोजित केली आहेत व येथून पुढील काळात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये संमेलने आयोजित करणार आहे.